परकीय चलन साठ्यात ७.०५ अब्ज डॉलरची घट; चलनसाठा 709.76 अब्ज डॉलरवर
नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.)। सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात घट झाली आहे. १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ७.०५ अब्ज डॉलरची घट होऊन ७०९.७६ अब्ज डॉलरवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी आकडेवारी जाहीर
Forex Reserves Decline 7 Billion


नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.)। सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात घट झाली आहे. १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ७.०५ अब्ज डॉलरची घट होऊन ७०९.७६ अब्ज डॉलरवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी आकडेवारी जाहीर केली असून, त्यानुसार १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ७.०५ अब्ज डॉलरचीघट होऊन ७०९.७६ अब्ज डॉलरवर आला आहे. एका आठवड्यापूर्वी देशाचा एकूण परकीय चलन साठयात ११.६८ अब्ज डॉलरची घट होऊन ७१६.८१ अब्ज डॉलरवर आला होता.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन साठ्याचा एक प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता, १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ७.६८ अब्जडॉलरचीघट होऊन ५५५.५७ अब्ज डॉलरवर आली आहे. तथापि, याच कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य ६६.४ करोड डॉलरने वाढून १३०.६८ अब्ज डॉलर झाले आहे.

आकडेवारीनुसार, १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात विशेष रेखांकन अधिकार (एसडीआर) २.३ करोड डॉलरने कमी होऊन १८.६९ अब्ज डॉलरवर आले. मध्यवर्ती बँकेनुसार, याच कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडील भारताची राखीव स्थिती १.५ करोड डॉलरने कमी होऊन ४.८१ अब्ज डॉलरवर आली.

हे उल्लेखनीय आहे की, २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ४.८८ अब्ज डॉलरने वाढून ७२८.४९ अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande