श्री श्री राधागोविंद मंदिरात संगीतमय श्रीरामकथा, रामायणाचार्य संतदास प्रभुजी करणार निरुपण
बीड, 21 मार्च (हिं.स.)। संत सावता माळी चौक बीड येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराच्या (इस्कॉन बीड) प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार, २६ मार्च या कालावधीत दुपारी ४.३० ते ७.३० संगीत
श्री श्री राधागोविंद मंदिरात संगीतमय श्रीरामकथा, रामायणाचार्य संतदास प्रभुजी करणार निरुपण


बीड, 21 मार्च (हिं.स.)।

संत सावता माळी चौक बीड येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराच्या (इस्कॉन बीड) प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार, २६ मार्च या कालावधीत दुपारी ४.३० ते ७.३० संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून रामायणाचार्य संतदास प्रभुजी

यांच्या सुमधूर वाणीतून संगीतमय राम कथेला प्रारंभ होणार आहे. दि.२६ मार्च रोजी श्रीराम नवमी महोत्सव साजरा केला जाणार दुपारी १ या दरम्यान श्री श्री राधागोविंद आहे. सकाळी ९ ते देवांचा अभिषेक, पुष्पाभिषेक, भजन, प्रवचन, महाआरती संपन्न होणार आहे. तसेच दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. तरी समस्त बीड जिल्हावासीयांना या

सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेवून श्री श्री राधागोविंद देवांचे कृपाशिर्वाद प्राप्त करावे असे आवाहन संत सावता माळी चौक येथील श्री श्री राधागोविंद मंदिर (इस्कॉन) बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

या कथेचा बीड शहरवासीयांनी सहकुटूंब, मित्र परिवारासह उपस्थित राहून भगवंताची कृपा प्राप्त करावी असे आवाहन श्री श्री राधा गोविंद मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande