उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे नागपुरात आगमन
नागपूर, २१ मार्च (हिं.स.) : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. त्यांच्या आगमनप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावन
उपराष्ट्रपती


नागपूर, २१ मार्च (हिं.स.) : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. त्यांच्या आगमनप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, एअर मार्शल याल्ला उमेश, मेजर जनरल नवतेजसिंग सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत केले.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे आज रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित भारतीय युवा संसदेच्या २९ व्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande