उपराष्ट्रपती नागपूर दौऱ्यावर : डॉ. हेडगेवरांच्या समाधीचे घेतले दर्शन
नागपूर, 21 मार्च (हिं.स.) : उराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन शनिवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचा
डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळी अभिवादन करताना उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन


नागपूर, 21 मार्च (हिं.स.) : उराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन शनिवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित भारतीय युवा संसदच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आज, शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. यापूर्वी त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुंजींच्या समाधीस्थळाला पुष्पांजली अर्पित करून अभिवादन केले. यापूर्वी तत्कालिन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील स्मृती मंदिराला भेट दिली होती. सी.पी. राधाकृष्णन हे रेशीम बाग स्मृती मंदिराला भेट देणारे दुसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत.

सी.पी. राधाकृष्णन हे शांत आणि अनुभवी नेते म्हणून ओळले जातात. त्यांचा सामाजिक प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून सुरू झाला आहे. तसेच ते दीर्घकाळ भाजपचे सदस्य राहिले आहेत आणि लहान वयातच भारतीय जनसंघाचे सदस्य झाले. दोन वेळा कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडून आले, तर २००४, २०१२ आणि २०१९ मध्ये पराभव झाला. तसेच त्यांनी तमिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आणि संसदेतील विविध समित्यांमध्ये वस्त्रोद्योग, सार्वजनिक क्षेत्र, वित्तीय व्यवहार सक्रिय सहभाग राहिला आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande