देशांतर्गत ई-लिलावाद्वारे तांदूळ विक्रीसाठी निविदा पाठविण्याचे एफसीआयचे आवाहन
मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय), महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने, समर्पित वाहतूक व्यवस्थेअंतर्गत खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) [ओएमएसएस(डी)] तांदळाच्या साठ्याची ई-लिलावात विक्री करण्यासाठी प्रस्ताव मा
तांदूळ


मुंबई, 23 मार्च (हिं.स.) -

भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय), महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने, समर्पित वाहतूक व्यवस्थेअंतर्गत खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) [ओएमएसएस(डी)] तांदळाच्या साठ्याची ई-लिलावात विक्री करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.

घाऊक प्रमाणात खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक आणि व्यापाऱ्यांना एफसीआयचे अधिकृत ई-लिलाव सेवा पुरवठादार, एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडकडे https://www.valuejunction.in/fci/ या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल.

25 मार्च 2026 आणि 26 मार्च 2026 रोजी होणाऱ्या आगामी ई-लिलावांसाठी, महाराष्ट्र विभागातून एकूण 50000 मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, समर्पित वाहतूक योजनेअंतर्गत 10% तुकडा (अख्खा दाणा नसलेला) तांदळासह 40000 मेट्रिक टन नॉन-एफआरके कस्टम मिल्ड राईस (सीएमआर) उपलब्ध करून दिला जात आहे. यातील पंजाबमधील 10000 मेट्रिक टन तर आंध्र प्रदेशमधील 30000 मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या बोलीदारांना ई-लिलावात किमान 2650 मेट्रिक टन तांदळासाठी बोली लावता येईल. निवड झालेल्या बोलीदारांनी मालाची वाहतूक आणि वितरणाच्या पुढील व्यवस्थेसाठी, माल अंतिमतः कुठल्या ठिकाणी पाठवला जाईल याची माहिती महाव्यवस्थापकांना (प्रादेशिक) कळवणे आवश्यक असेल.

खुल्या बाजारात अन्नधान्याचा पुरवठा वाढवून वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यास मदत करणे हा खुल्या बाजारातील विक्री योजनेचा (देशांतर्गत) उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande