मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाविद्यालयस्तरावर होणारी अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्ष
मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाविद्यालयस्तरावर होणारी अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा २५ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे.

पत्रात विद्यापीठाने सत्र परीक्षांची तयारी सुरू केली आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विद्यापीठाने प्राचार्यांना दिलेल्या वेळापत्रकासह विविध सूचना करण्यात आल्या आहेत. २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा, मानव्य विज्ञान विद्याशाखा व आंतरविद्याशाखीय अभ्यास

विद्याशाखांतर्गत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा याच दरम्यान घेण्याबाबत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बॅचेस तयार करून परीक्षेचे वेळापत्रक फलकावर लावावेत. परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक आवश्यक असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणयाद्या सात दिवसांच्या विद्यापीठाकडे सादर करण्यात याव्यात असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांनी पत्रात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande