आषाढी वारीत सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.)। आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी मानाच्या १० पालख्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी जर्मन हॅंगर (मंडप) उभारण्यात येणार आहेत. यंदा सोलापूरसह पुणे आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील मुक्कामस्थळी
ZP CEO Jagam


सोलापूर, 23 मार्च (हिं.स.)।

आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी मानाच्या १० पालख्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी जर्मन हॅंगर (मंडप) उभारण्यात येणार आहेत. यंदा सोलापूरसह पुणे आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्याची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात ४३ ठिकाणी सुमारे ९ लाख चौ. फुटांवर जर्मन हॅंगर उभारण्यात आले होते. यंदा या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मुक्कामाची ठिकाणे तसेच मंडप उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेबाबत माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने जर्मन हॅंगर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे पालखी मानकरी, वारकरी तसेच प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. मागील वर्षी या मंडपांमुळे वारीतील १० लाखांहून अधिक वारकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यंदा अधिक ठिकाणी मंडप उभारून अधिक वारकऱ्यांना सुविधा देण्याचे नियोजन आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande