
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.)।
मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार गतिमान व्हावा, पालिकेच्या कारभाराची माहिती व प्रश्न नागरिकांना मांडता यावे या दृष्टिकोनातून ऑनलाइन संकेतस्थळाचा पर्याय नागरिकांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन धनश्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभा काळुंगे यांनी व्यक्त केले.
शहरातील नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, डॉ. पुष्पांजली शिंदे, पक्षनेते प्रशांत गायकवाड यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्षा काळुंगे म्हणाल्या की,अन्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कामकाजाची माहिती होत नाही व त्यांच्या स्वतःच्या काही अडचणी मांडण्यासारखे ते कर्मचारी असल्यामुळे त्यांना पालिकेच्या कामकाजा दिवशी पालिकेत येणे शक्य होत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड