
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)।
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील श्री प्यारेजी महाराज स्पोर्ट्स अकॅडमी येथे २४ ते २७ मार्च या कालावधीत ३८ व्या राष्ट्रीय ज्युनिअर नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना झाला.
या स्पर्धेसाठी शहरात महाराष्ट्र संघाची निवड चाचणी होऊन, या निवड चाचणीतून राष्ट्रीय पूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी संभावित खेळाडूंची निवड करण्यात आली. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर सुरू होऊन, शिबिरातून अंतिम संघाची घोषणा राज्य संघटनेचे अध्यक्ष सतीश इंगळे यांच्या हस्ते झाली. महाराष्ट्र मुलांच्या संघाचा कर्णधार म्हणून राष्ट्रीय खेळाडू राजवर्धन इंगळे, उपकर्णधार म्हणून राष्ट्रीय खेळाडू भविष्य वाघ, तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी कल्याणी चव्हाण व उपकर्णधारपदी ऋचा केणेकर यांची निवड करण्यात आली.
राज्याचा संघ मुलांचा संघ (छत्रपती संभाजीनगर), भविष्य वाघ (धुळे), ओम पोकळे (अहिल्यानगर), सार्थक मठपती (लातूर), ओम ताठे (धाराशिव), अथर्वराज गोरे (पुणे), पियुष तेली (जळगाव), ऋषिकेश पठाडे (छत्रपती संभाजीनगर), सार्थक पाटील (धुळे), अंश बोरपकर (ठाणे), ऋग्वेद दुबे (नाशिक), सौमिल गायकवाड (पुणे). मुलींचा
संघ कल्याणी चव्हाण (धुळे), तनिषा बनकर (छत्रपती संभाजीनगर), पायल लव्हे (पुणे), दिव्या कडलग (अहिल्यानगर), स्नेहल भामरे (नाशिक), समीक्षा कुमरे (लातूर), हर्षाली पाटील (धुळे), शिवांजली यादव (पुणे), अंशू राठोड (सांगली), स्वरा कळस्कर (अहिल्यानगर), ऋचा कॅनेकर (अहिल्यानगर), प्रणिशा फाजगे (लातूर). संघासोबत प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून प्रथमेश ढेरंगे, निलेश चौधरी, आकाश सरदार, हर्षवर्धन मगरे, दिपाली प्रधान, वैष्णवी खरात हेही शहरातून रवाना झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis