सोलापूरात स्मशानभूमी प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरणार
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्यामुळे समाजातील संताप उफाळून आला आहे. विशेषतः आ. विजयकुमार देशमुख यांनी पाच वेळा पत्रव्यवहार करूनही या विषयावर ठोस निर्णय न घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना अपमानास्पद वागणूक मि
सोलापूरात स्मशानभूमी प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरणार


सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्यामुळे समाजातील संताप उफाळून आला आहे. विशेषतः आ. विजयकुमार देशमुख यांनी पाच वेळा पत्रव्यवहार करूनही या विषयावर ठोस निर्णय न घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप आ. देशमुख गटाच्या नगरसेवकांचा आहे. महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेबद्दल लिंगायत समाजामध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामागे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे यांच्या सूचनेनुसार ही वागणूक दिल्याचा आरोपही समाजातील काही घटकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande