अमरावती - ८-९ महिन्यांपासून एमआरआय मशीन बंद; रुग्णांना हजारोंचा आर्थिक फटका
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) जिल्हा सामान्य रुग्णालयातील MRI मशीन मागील ७-८ महिन्यांपासून बंद असल्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही मशीन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आली असली तरी अद्याप सुरू करण्य
८-९ महिन्यांपासून MRI मशीन बंद; रुग्णांना हजारोंचा आर्थिक फटका


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) जिल्हा सामान्य रुग्णालयातील MRI मशीन मागील ७-८ महिन्यांपासून बंद असल्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही मशीन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आली असली तरी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, गरजू रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जाऊन ८ ते २० हजार रुपये खर्च करून MRI तपासणी करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना बाहेर धाव घ्यावी लागत असल्याने उपचारात विलंब होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच, MRI सेवा बंद ठेवून काही जणांना खाजगी केंद्रातून फायदा होत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ MRI सेवा सुरू करून रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande