उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून ८ विशेष गाड्यांची घोषणा
जळगाव , 24 मार्च (हिं.स.) उन्हाळ्याची सुट्टी जवळ येत असताना प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आरामदायी आणि सुलभ प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेकडून उन्हाळी हंगामात तब्बल ८ अतिरिक्त विशेष गाड्
उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून ८ विशेष गाड्यांची घोषणा


जळगाव , 24 मार्च (हिं.स.) उन्हाळ्याची सुट्टी जवळ येत असताना प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आरामदायी आणि सुलभ प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेकडून उन्हाळी हंगामात तब्बल ८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष यातील काही गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आल्यानं जळगावकरांना आरामदायी प्रवास करता येईल.

ट्रेन क्रमांक 01021 ही विशेष गाडी ३ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01022 ही विशेष गाडी दिनांक ३ एप्रिल रोजी नागपूर येथून २०.०० वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाड्यांचे थांबे ठाणे, कल्याण, इगतपुरी (ट्रेन क्रमांक 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे असतील.ट्रेन क्रमांक 01467 ही विशेष गाडी ३ एप्रिल रोजी पुणे येथून १५.५० वाजता निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01468 ही विशेष गाडी दिनांक ४ एप्रिल रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. या रेल्वे गाड्यांचे थांबे उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे असतील.ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता निघेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगांव येथून १६.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे थांबे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी इथे असतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande