
लातूर, 24 मार्च (हिं.स.)।लातूर येथील शासकीय वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय येथील वस्तीग्रह च्या मेस मध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे व जेवणात आळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या वतीने मनवीसे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती.
किरण चव्हाण यांनी कृषी महाविद्यालयच्या वस्तीगृहाच्या मेसमध्ये मंगळवारी दि. 24 मार्च रोजी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता विद्यार्थ्यांनीही निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे सांगितले. याबाबत कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता बाबासाहेब ठोंबरे यांना निवेदन देऊन संबंधितावर कारवाई करण्याबाबत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या सर्व तक्रारींवर तात्काळ कारवाई नाही झाली तर मनविसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनवीसे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांनी निवेदन देऊन दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis