तळोधी वनपरिक्षेत्रात सरपणासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
चंद्रपूर, 25 मार्च (हिं.स.)। तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला जंगल परिसरात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. तळोधी बाळापुर येथील प्रमिला अरुण वाडगुरे (४६)
तळोधी वनपरिक्षेत्रात सरपणासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू


चंद्रपूर, 25 मार्च (हिं.स.)।

तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला जंगल परिसरात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

तळोधी बाळापुर येथील प्रमिला अरुण वाडगुरे (४६) ही महिला नेहमीप्रमाणे तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला नियत क्षेत्रात गावातील पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. सर्व महिलांनी सरपण जमा करून परतण्याची तयारी सुरू केली होती. याच वेळी तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये वाघाने अचानक प्रमिलावर झडप घातली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा करत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने महिलांमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande