दोन दिवसात सोन्या-चांदीचे दरात मोठी वाढ
जळगाव, 25 मार्च (हिं.स.)सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी झालेल्या विक्रमी घसरणीनंतर आता बाजारात अचानक तेजीचे वातावरण निर्माण झाले अ
दोन दिवसात सोन्या-चांदीचे दरात मोठी वाढ


जळगाव, 25 मार्च (हिं.स.)सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी झालेल्या विक्रमी घसरणीनंतर आता बाजारात अचानक तेजीचे वातावरण निर्माण झाले असून, या बदलामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात सुमारे ५ हजार रुपयांची वाढ झाली असून, दोन दिवसांच्या कालावधीत ही वाढ तब्बल ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अल्पावधीतच सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरातही तितकीच मोठी वाढ झाली असून, केवळ २४ तासांत चांदीच्या भावात तब्बल २२ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहेया वाढीमुळे जळगावच्या बाजारात सध्या सोन्याचा दर १ लाख ४० हजार ५०० रुपये इतका झाला आहे, तर चांदीचा दर २ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला असून, अनेकांनी सध्या खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. सोने तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. विशेषतः युद्धासंदर्भात अमेरिकेने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात, त्यामुळे मागणी वाढून दरही वाढतात. याचाच परिणाम सध्या स्थानिक बाजारातही दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande