
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही नावे जाहीर केली असून, सर्व पदांवरील नेमणुका सव्वा वर्षाकरिता राहणार आहेत.
जाहीर झालेली नावे अशी -
विलास चाळके - उपाध्यक्ष, बांधकाम व आरोग्य विभाग)
मयूरी मिलिंद शिर्के - सभापती, महिला व बालकल्याण विभाग
महेश राघू नाटेकर - सभापती, कृषि व पशुसंवर्धन विभाग
ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे - सभापती - समाजकल्याण विभाग
नंदकुमार नारायण मुरकर - सभापती, अर्थ व शिक्षण विभाग.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी