मुंढवा जमीन चौकशी अहवाल विधानसभेत सादर
मुंबई, 25 मार्च (हिं.स.) - पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व
मुंढवा जमीन चौकशी अहवाल विधानसभेत सादर


मुंबई, 25 मार्च (हिं.स.) - पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात अधिकृत निवेदन केले. अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल तयार केला असून, तो आता विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

पुण्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय आणि कायदेशीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सखोल चौकशी करून आपला अहवाल १२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य शासनास सादर केला होता. तो आज सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्याबरोबरच हा अहवाल महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://rfd.maharashtra.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande