रत्नागिरी : पोस्ट विभागाचे व्यवहार 1 आणि 2 एप्रिल रोजी बंद
रत्नागिरी, 27 मार्च, (हिं. स.) : 2025-26 आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत आहे. सरत्या आर्थिक वर्षाच्या दृष्टीने काही कामकाज वर्षअखेर करणे आवश्यक असल्याने 1 एप्रिल व 2 एप्रिल 2026 हे दोन दिवस व्यवहार बंद दिवस म्हणून पोस्ट विभागाने घोषित केले आहेत.

या दोन दिवशी सर्व सीबीएस पोस्ट ऑफिसमध्ये काउंटरवर कोणतेही पीओएसबीचे व्यवहार केले जाणार नाहीत. तसेच डीओपी ई बँकिंग/एम बँकिंग, आयपीपीबी-पीओएसबी स्वाइप इन व स्वाइप आऊट या सर्व सुविधा 1 व 2 एप्रिल 2026 दोन दिवशी उपलब्ध असणार नाहीत. पोस्ट ऑफिसच्या सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande