छ.संभाजीनगर - सोमवारी डाक अदालतीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात सोमवार दि.३० रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर डाक विभागाच्या सेवांबाबत तक्रारींचे निवारण सहा आठवड
छ.संभाजीनगर - सोमवारी डाक अदालतीचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात सोमवार दि.३० रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर डाक विभागाच्या सेवांबाबत तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये घेतली जाते. तरी संबंधितांनी आपली डाक सेवेबाबतची तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ यांच्या नावे दोन प्रतित पाठवावी. नंतर प्राप्त तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande