
चंद्रपूर, 28 मार्च (हिं.स.)।जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोलपंपधारक, गॅस एजन्सीचे मालक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी आढावा बैठक घेऊन जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी 7.05 लक्ष लिटर पेट्रोल, 5.93 लक्ष लिटर डिझेल उपलब्ध असल्याचे समोर आले.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 146 पेट्रोल पंप असून यात 35 एचपीसीएल कंपनीचे, 46 बीपीसीएल, 45 आयओसीएल आणि इतर 20 पेट्रोलपंप यांचा समावेश आहे. आजघडीला (दि. 28) चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा 9 लक्ष 31 हजार 991 लिटर असून त्यापैकी 2 लक्ष 26 हजार 130 लिटर पेट्रोलची विक्री झाली तर 7 लक्ष 5 हजार 861 लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. डिझेलचा एकूण साठा 9 लक्ष 76 हजार 927 असून यापैकी 3 लक्ष 83 हजार 35 लिटर डिझेलची विक्री झाली. तर 5 लक्ष 93 हजार 892 लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅस कनेक्शनची एकूण संख्या 6 लक्ष 49 हजार 313 आहे. यात एचपीसीएल कंपनीचे 1 लक्ष 46 हजार 514 ग्राहक, आयओसीएल कंपनीचे 4 लक्ष 39 हजार 282 ग्राहक तर बीपीसीएल कंपनीचे 63 हजार 517 ग्राहक आहेत. जिल्ह्यात एकूण सिलिंडरचा साठा 14 हजार 352 अस त्यापैकी 7578 सिलिंडरचे वाटप तर 6774 सिलिंडर साठा उपलब्ध आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून नियमितपणे पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर जिल्ह्यासाठी उपलब्ध होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव