“मोदी –ट्रम्प चर्चेत एलन मस्क नव्हते”- रणधीर जयसवाल
विदेश मंत्रालयाकडून एलन मस्कच्या सहभागाच्या अफवांचे खंडण नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियात इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्त्रायलने सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र
रणधीर जयस्वाल , परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते


विदेश मंत्रालयाकडून एलन मस्कच्या सहभागाच्या अफवांचे खंडण

नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियात इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्त्रायलने सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात 24 मार्च रोजी चर्चा झाली होती. या चर्चेत अमेरिकन उद्योगपती एलन मस्क सहभागी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खंडण केले आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्राने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सदर चर्चेत एलन मस्क सहभागी झाल्याचे वृत्त दिले होते. परंतु, वर्तमानपत्राला कथित माहिती देताना एलन मस्क चर्चेत का सहभागी झाले आणि काय बोलले याबाबत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. परंतु, तरी देखील याबाबत बातमी प्रकाशित झाली. त्यानंतर यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, चर्चेत मस्कच्या सहभागासंदर्भातील वृत्त चुकीचे आहे. गेल्या 24 मार्चला झालेली टेलिफोन चर्चा फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात झाली. या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण झाल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेतनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करून सांगितले होते की, दोन्ही नेत्यांनी खुले, सुरक्षित आणि सुलभ होर्मुज स्ट्रेटसाठी आवश्यकतेवर भर दिला आणि या भागातील तणाव कमी करण्यास व शांतता राखण्यास भारताचा दृष्टिकोन पुन्हा स्पष्ट केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande