
नवी दिल्ली, : पंजाब आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यांची नावे अब्बू गाबा हुरैरा आणि उस्मान अशी असून पोलिसांनी मालेरकोटला येथील शेरवानी कोट गावात केलेल्या छापेमारीत हे दोघे ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक नशा तस्करी विरोधी मोहिमेतून झाली होती.
पोलिसांनी या मोहिमेत एका स्थानिक अंमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोन व्यक्तींबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली.माहितीनुसार, दोघांची ओळख जम्मू-काश्मीरमध्ये सूचीबद्ध दोन वॉन्टेड दहशतवाद्यांशी जुळते. गावकऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार अब्बू गाबा हुरैरा आणि उस्मान बराच काळ गावात भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. तसेच गेली 15 वर्षे ते देशाच्या विविध भागात राहुन भारत विरोधी कारवाया करायचे परंतु, त्यांच्याबद्दल कुणाला शंकाल आली नव्हती.
15 वर्षांहून अधिक काळ भारताच्या विविध ठिकाणी राहूनही त्यांची देशविरोधी हालचाली किंवा
मालेरकोटला येथील महोराणा सीआयए विंगच्या टीमने शेरवानी कोट गावात छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतले आणि नंतर जम्मू-काश्मीर पोलिसांना सुपूर्द केले.
याच कारवाईदरम्यान, सीआयए आणि सायबर क्राईम युनिटने धर्माच्या नावाखाली युवकांना कट्टरपंथी बनवण्याच्या आरोपाखाली फरहान अंजुम, अदनान खान, आणि वारिस अली यांनाही अटक केली. पोलिसांनी या ऑपरेशन दरम्यान.32 बोरची पिस्तूल, तीन कारतूस आणि 4 मोबाइल फोन जप्त केले. दरम्यान पोलिसांनी या कारवाईचे संपूर्ण तपशील अद्याप जाहीर केलेले नाहीत, आणि पुढील तपास सुरु आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी