भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रात तांदूळ साठा विक्रीचे आयोजन
मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) या योजने अंतर्गत ई-लिलावाच्या माध्यमातून, विशेष मालवाहतुकीद्वारे तांदळाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. जे खरेदीदार तांदळ
Sale of Rice Stock Organized by Food Corporation of India


मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) या योजने अंतर्गत ई-लिलावाच्या माध्यमातून, विशेष मालवाहतुकीद्वारे तांदळाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. जे खरेदीदार तांदळाचा साठा खरेदी करण्यास इच्छुक आहेत, ते एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड (https://www.valuejunction.in/fci/) या भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडे आपली नोंदणी करून या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

खुला बाजार विक्री योजनेतंर्गत (देशांतर्गत) विशेष मालवाहतुकीच्या माध्यमातून दि. 01.04.2026 आणि 02.04.2026 रोजी होणाऱ्या आगामी लिलावा अंतर्गत महाराष्ट्र विभागातून एकूण 50,000 मेट्रिक टन तांदूळ आणि 40,000 मेट्रिक टन नॉन-एफआरके सीएमआर (Non-FRK CMR - Non-Fortified Rice Kernels Custom Milled Rice) तांदूळ (यात 10% तुकडा तांदूळ असून 10,000 मेट्रिक टन पंजाबमधून आलेला तर 30,000 मेट्रिक टन आंध्र प्रदेशातून आलेला तांदूळ आहे) उपलब्ध करून दिला जाणार आहे. या ई लिलावात तांदळाचा मोठा साठा विकत घेणारे ग्राहक तसेच व्यापारीही सहभागी होऊ शकतात. नोंदणीकृत बोली लावणाऱ्यांनी किमान 2,650 मेट्रिक टन इतक्या प्रमाणासाठी बोली लावता येणार आहे. यशस्वी बोली लावणाऱ्यांनी त्यांना तांदळाचा साठा कुठे उतरवून हवा आहे, त्या रेल्वे स्थानाकाचे ठिकाण महाव्यवस्थापकांना (प्रादेशिक) कळवावे लागणार आहे. खुला बाजार विक्री योजनेतंर्गत (देशांतर्गत) राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande