
नाशिक, 28 मार्च (हिं.स.) : नाशिक जिल्हा जम्प-रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प-रोप असोसिएशन यांच्या वतीने आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये आयोजित २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेवर आपली छाप सोडली. महाराष्ट्राबरोबर, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करत पदकांची कमाई केली.
मुलीच्या गटात महाराष्ट्राकडून खेळतांना वैभवी यशदा वाडेकर, अनन्या शिंदे, भूमिका नेमाडे, तन्वी नेमाडे, कैवल्या खंडारे, पद्माक्षी मोकळ या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली. या खालोखाल हरियाणाच्या दिशा, इशिता,उर्जिता गोयल, यांनाही सुंदर खेळ करत पदके मिळविली. मध्य प्रदेशच्या वैभवी शर्मा हीनेही चांगला खेळ करत पदके मिळवली तर उत्तर प्रदेशच्या प्रिया पाठक हिनेही सुंदर खेळ करत दुहेरी पदकाची कमाई केले.
पथक
मुलांच्या गटात मध्य प्रदेशच्या परम श्रीवास्थव, तरुण लोथ, यांनी दोन प्रकारात सुंदर खेळ करत पदके प्राप्त केली. दिल्लीच्या यश सिंग याने दोन वेग्वेगळ्या प्रकारात सातत्य राखत पदके मिळविली.
आज झालेल्या काही गटांच्या स्पर्धामध्ये विजेत्या पहिल्या तीन खेळाडूंनी प्रमुख पाहुणे नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, जिल्हा जम्परोप असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, जिल्हा सचिव राजू शिंदे, महाराष्ट्र जम्प-रोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम यांच्या हस्ते मेडल प्रदान करून गौरवण्यात आले.
उद्या या स्पर्धाच शेवटचा दिवस असून उद्या विविध गटांचे सामने तसेच सांघिक स्पर्धा पार पडतील. या विविध प्रकारांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांची गुणानुक्रमे बेरीज करून या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेता संघ ठरवण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली.
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेला संपूर्ण भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला याचे मला समाधान आहे अश्या भावना जेष्ठ क्रीडा संघटक चंद्रशेखर सिंग यांच्यासाठी यांनी व्यक्त केल्या.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV