
नवी दिल्ली , 30 मार्च (हिं.स.)।दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठे यश मिळवत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT)चा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. ही कारवाई दिल्ली सीमेवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, लोन हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या निर्देशानुसार भारतात लष्कर-ए-तैयबाचा नवीन मॉड्यूल सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस आणि सुरक्षा दलांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला दिल्ली सीमेवरून अटक केली. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्या नेटवर्क, सहकारी आणि भारतातील कारवायांबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. सुरुवातीच्या तपासात तो आयएसआयच्या इशाऱ्यावर भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
अलीकडच्या काळात दिल्ली आणि दक्षिण भारतात लष्कर-ए-तैयबाच्या मॉड्यूलचा देखील भंडाफोड करण्यात आला होता. या मॉड्यूलने दिल्ली आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये भारतविरोधी पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील काश्मिरी गेट बसस्थानक आणि मेट्रो स्टेशन परिसरात भारतविरोधी अनेक पोस्टर्स लावण्यात आले होते. माहितीनुसार, या मॉड्यूलचे संचालन बांगलादेशातून शब्बीर अहमद लोन करत होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode