जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करा : आमदार राजेश मोरे
डोंबिवली, 30 मार्च (हिं.स.)। काम करत असतानाही एखाद्या कामगाराला इजा किंवा त्याचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याला सरकारी मदत मिळते. पण त्याची कामगार म्हणून सरकार दरबारी नोंद असणे आवश्यक आहे. तसेच काम करताना सुरक्षा मिळालीच पाहिजे व हा त्यांचा हक्क
Kamgar


डोंबिवली, 30 मार्च (हिं.स.)।

काम करत असतानाही एखाद्या कामगाराला इजा किंवा त्याचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याला सरकारी मदत मिळते. पण त्याची कामगार म्हणून सरकार दरबारी नोंद असणे आवश्यक आहे. तसेच काम करताना सुरक्षा मिळालीच पाहिजे व हा त्यांचा हक्क आहे. त्याकरिता महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी नोंद करणे आवश्यक आहे. म्हणूनच जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करणे गरजेचे आहे असे वक्तव्य शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत केले. आमदार मोरे नाका कामगारांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच सेप्टी किट वाटप कार्यक्रमात बोलत होते.

पूर्वेकडील गांधीनगर येथील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी सहायक कामगार आयुक्त अनघा क्षिरसागर, आमदार राजेश मोरे, शिवसेना नगरसेवक हर्षद मोरे, सूरज मराठे, शिवसेना पदाधिकारी अनिल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने 250 नाका कामगारांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच सेप्टी किट वाटप करण्यात आले. संघटनेच्या प्रयत्नाने कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून दिल्या जाते त्याचबरोबर कामगारांच्या स्वतःच्या विवाह करिता तीस हजार रुपये मिळवून दिल्या जाते कामगाराच्या मुलीच्या विवाह करिता 51 हजार रुपये मिळवून दिल्या जाते कामगारांना आरोग्याच्या सर्व योजनेचा लाभ संघटनेच्या वतीने मिळवून दिला जातो काम करत असताना एखाद्या कामगाराचं दुःखद निधन झालं तर त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आणि त्याच्या विधवा पत्नीस पुढील पाच वर्ष वर्षाला 24 हजार रुपये दिले जाते. संघटनेच्या प्रयत्नाने नाका कामगारांना कामगार महामंडळाच्या 30 योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.

यावेळी संघटनेचे खजिनदार विश्वनाथ रेवगडे, सहखजिनदार रामचंद्र वाघ, कार्याध्यक्ष कारभारी रेवगडे, केंद्रीय कमिटी सदस्य कमलाकर पाटील, चंद्रकांत गायकवाड, रामेश्वर शेजुळ, केशव मिसाळ केंद्रीय कमिटी सदस्य बद्रीनाथ मखरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे म्हणाल्या, कामगारांशिवाय शहराचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे कामगारांची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून शासन कामगारांना सेफ्टी किट देत आहे. कामगारांनी शासनाकडे आपली नोंद करणे आवश्यक आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande