
रत्नागिरी, 30 मार्च, (हिं. स.) : चिपळूण येथील नवयुग हनुमान मित्र मंडळातर्फे ४८वा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्ताने रामरक्षा पठण स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा गुरुवारी, दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक संस्कार व संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा तिसरी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा दोन गटांत पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १५००/-, द्वितीय १००१/- आणि ५०१/- रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्तेजनार्थ बक्षीसदेखील देण्यात येईल.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी आपली नावे नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी विशाल राऊत (९५६१७८१४३७) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी