
परभणी, 30 मार्च (हिं.स.)।
मोटारसायकलवरून चोरट्या मार्गाने देशीदारूची विक्री करणार्या दोघा इसमास स्थानिक गुन्हा शाखा व चारठाणा पोलीसांनी कारवाई करत देशीदारूचे ६ बाॅक्ससह दुचाकी असा एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची केल्याची कारवाई केली.चारठाणा येथील नागनाथ गायकवाड व राजू पवार हे दोघे एमएच २२ एआर ५७८४ क्रमांकाच्या दुचाकीने सावरगावतांडा येथून देशीदारूच्या ६ पेट्या विनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती स्थिनिक गुन्हा शाखेचे मुकेश बुंधवत, पाडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, चारठाणा पोलीसांचे पोलिस हवालदार एच. पी गायकवाड यांना मिळाल्यावरून सावरगावतांडा - चारठाणा रस्त्यावरून दोघाना ताब्यात घेतले. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या माणिक डुकरे यांच्या फिर्यादीवरून नागनाथ गायकवाड व राजु पवार यांच्याविरुद्ध चारठाणा पोलीसांत गुरन ५२/२०२६ कलम ६५ (ई) ८३, (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार एच. पी गायकवाड हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis