
शेतकऱ्यांच्या शेत - बांधापर्यंत थेट बैलगाडी,ट्रॅक्टर व यंत्र सामग्री पोहचू शकेल असे बारमाही रस्ते निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून यासाठी आपण आपल्या आमदार निधीतून सुमारे 5 कोटी रुपये देणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले .
पाणंदीसाठी १४ योजनांमधून निधी.....!
श्री. मुश्रीफ म्हणाले, या अभियानांतर्गत पानंदी शंभर टक्के यांत्रिकीकरणातून होणार आहेत. पानंदी तयार करण्यासाठी सी. एस. आर. सह १५ वा वित्त आयोग, खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जन सुविधांकरीता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांकरीता मिळणारे अनुदान, जिल्हास्तरीय खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, ग्रामपंचायतींचे स्व- उत्पन्न, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी, ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे म्हणजेच 25:15, इतर जिल्हा योजना, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, आदिवासींसाठी नाविन्यपूर्ण योजना यासारख्या विविध १४ शासकीय योजनांतून निधी उपलब्ध होणार आहे.
या आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar