देशभरातील शाळांना बॉम्बची धकमी देणाऱ्याला अटक
म्हैसुरू, 30 मार्च (हिं.स.) : दिल्ली पोलिसांनी देशभरातील शाळा, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांना 1000 हून अधिक वेळा बॉम्बने उडवण्याच्या खोट्या धमक्या देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव श्रीनिवास असून त्याला कर्नाटकच्या म्हैसुरू येथून ताब्या
अटक लोगो


म्हैसुरू, 30 मार्च (हिं.स.) : दिल्ली पोलिसांनी देशभरातील शाळा, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांना 1000 हून अधिक वेळा बॉम्बने उडवण्याच्या खोट्या धमक्या देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव श्रीनिवास असून त्याला कर्नाटकच्या म्हैसुरू येथून ताब्यात घेण्यात आले असून तो डिजिटल माध्यमांचा वापर करून दहशत पसरवत होता.

देशभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणात आरोपीने ईमेल, मेसेज आणि फोन कॉलच्या माध्यमातून शाळा, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांना वारंवार धमक्या दिल्या होत्या. या प्रकारामुळे सुरक्षायंत्रणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. दिल्ली पोलिसांनी रविवारी म्हैसुरू येथील वृंदावन लेआउटमधील भाड्याच्या घरातून आरोपीला अटक केली. तेथूनच तो सतत खोट्या धमक्या देऊन सुरक्षा यंत्रणांना आव्हान देत होता. गेल्या काही महिन्यांत देशभरातील अनेक शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रत्येक घटनेनंतर पोलिस आणि बॉम्ब शोध पथकांना तातडीने कारवाई करावी लागत होती. तपासात या सर्व धमक्या खोट्या असल्याचे समोर आले. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दिल्ली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि आरोपीचा माग काढत त्याला मैसूरुमध्ये शोधून काढले. आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande