‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत ७५ विजेत्यांची निवड
मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात, ७५ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. बु
‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत ७५ विजेत्यांची निवड


मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात, ७५ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली.

देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करुन ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने Vision to Art: The National Poster Design Contest” ही राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. यासाठी ॲडव्हरटाईसिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) आणि Manifest या संस्थेचे विशेष सहकार्य मिळाले.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यास्पर्धेमध्ये स्वतंत्र डिझायनर, ब्रँडिंग व डिझाइन स्टुडिओ, जाहिरात व क्रिएटिव्ह एजन्सीज, तसेच डिझाइन व व्हिज्युअल कम्युनिकेशनचे विद्यार्थी अशा सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. या स्पर्धेसाठी एकूण ९ विषय देण्यात आले होते. त्यात,आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट,मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि क्लायमेट चेंज (हवामान बदल) या विषयांचा समावेश होता.

या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतभरातून आणि विविध वयोगटांमधून सुमारे ३ हजाराहून नोंदी प्राप्त झाल्या. पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींंसह भारतातील नामवंत क्रिएटिव्ह दिग्गजांनी काटेकोर मूल्यमापन व परीक्षक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतिम ७५ विजेत्यांची निवड या स्पर्धेत करण्यात आली.

या स्पर्धेचे परिक्षण पुढील परिक्षकांनी केले...

१.अच्युत पालव - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय सुलेखनकार आणि शिक्षक

२. वासुदेव कामथ - पद्मश्री पुरस्कार विजेते - आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित भारतीय कलाकार

३. सुधारक ओलवे - पद्मश्री पुरस्कार विजेते - मुंबईस्थित माहितीपट छायाचित्रकार

४. प्रसून जोशी - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे सीईओ

५. रवी जाधव - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता

६. भरत दाभोलकर - भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक

७. गौरव दालमिया - दालमिया ग्रुप होल्डिंग्जचे अध्यक्ष

८. श्रीनिवासन स्वामी - आर के स्वामी लिमिटेडचे ​​कार्यकारी गट अध्यक्ष आणि जाहिरात एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय) चे अध्यक्ष.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे...

SKILL INDIA

आस्था गुप्ता

अखिलेश आहुजा

आर्या पनवार

महेश बोलईकर

राजेश गज्जर

झिकोलन

आत्मनिर्भर इंडिया

अभिषेक बिष्ट

अनिकेत दुबे

जॉय देबनाथ

मिताली कापुरे

सेजल.एच.शाह

उमेश एस

वृषिन यादव

स्वच्छ भारत अभियान

अमन झा

कमलेश वैशाली

अनंत मुरुडकर

खुशी तोमर

मल्हार भरत सरवदे

ओम अनिल धाडगे

सोहनी सिंग

वैष्णवी दीक्षित

WAVES SUMMIT

हातिम अबीझर

कमलेश वैशाली अनंत मुरुडकर

लीना डिसूझा

शिविका पांडे

सुहानी गुप्ता

योग

अजितेश शर्मा

नील नाडर

रुजवी किरण संकपाल

शाक्षी शारदा

श्रुती गोलम

विनय कुमार मौर्य

हवामान बदल

अर्पिता बंडू मनवतकर

अविशेक साहू

दिशांत प्रशांत ढगे

कुमार सत्यम सिन्हा

रोहित राज

शुभम बिष्ट

सिया सत्यवान मालेकर

उमेश दत्ताराम निगडे

बेटी बचाओ बेटी पढाओ

अभ्रक भट्टाचार्य

आकाश कुमार

आनंद सोनाजी गायकवाड

आर्या गहाणे

आर्या नागवेकर

भाग्यश्री जोशी

चेतन महिंद्र पांचाल

विनोद मोहन बंजारा

श्याम पतंगे

लक्ष्मण बाबू ससेमारी

साईराज शिगवण

संजीव मेंढे

पार्थ गुप्ता

यशप्रिया

संजय कमिल्या

ऋतुजा जंगम

उमेश दत्ताराम निगडे

मेक इन इंडिया

चॅटरबॉक्स कम्युनिकेशन

वल्लभ येवलेकर

शर्वरी शरद सावंत

नमन दवे

कृषा वखारिया

इशिता पटनाईक

ईश्वरी प्रवीण तारकर

साची शुक्ला

संदीप कुमार

संयुक्ता शेखर पवार

विराज विजय पटवेकर

डिजिटल इंडिया

हर्ष जगताप

कलीम अख्तर

निलेश परमात्मा यादव

उत्कर्ष भदाडे

कस्तुरी पटेल

गोरख जे. घोलप

श्रीरंग अमृता देवेंद्र साळुंखे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande