“लाईनमन दिन” महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात साजरा
चंद्रपूर, 04 मार्च, (हिं.स.)। राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचोवीणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीणाऱ्या वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या '' विजेला '' सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्ष
४ मार्च “लाईनमनदिन” महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात साजरा


चंद्रपूर, 04 मार्च, (हिं.स.)। राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचोवीणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीणाऱ्या वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या ' विजेला ' सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात तदवतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला.

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे आणि अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी सर्वप्रथम सभागृहाच्या प्रवेशद्वारात उभे राहून सर्व लाईनमन बांधवांचे पुष्प देऊन स्वागत केले. सर्वांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देत समृद्धीचे, विकासाचे, नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हेच ध्येय महावितरणचे' अशा शब्दांनी सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीजसुरक्षेची शपथ देण्यात आली. महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहात, जनमित्र हे ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात. कधी,चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर पुरात पोहून जात,धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात, गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गाम-अती-दुर्गम आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणचे 'आधारस्तंभ '-जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपले जीवनमानाची काळजी घ्या व दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका. कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरणसाठी, महावितरणचा तुम्ही महत्वाचा ' दुवा 'आहात ,असे ते म्हणाले.

संध्या चिवंडे यांनी लाईनमन दिनानिमित्त लाईनमन दिवसाच्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व नवनवीत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंते यांना निर्देश देऊन चंद्रपूर मंडळांतर्गत वीज बिल वसुलीचे लक्ष्य गाठण्याकरिता मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दाव्हेकर, योगेंद्र निचत, विकास शहाडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, वरीष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरिवार हे उपस्थित होते. लाईनमन दिनानिमित्त चंद्रपूर मंडळा अंतर्गत असलेले तांत्रिक कर्मचारी विजय इंगोले, सरोजिनी लोखंडे, रोशना कामतवार, आणि सुमेध वनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा,कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप वावरे उपस्थित होते. पुंडलिक वणवे आणि डॉ. अनिष नायर यांनी सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले.

चंद्रपूर, बल्लारशा, वरोरा, गडचिरोली, आलापल्ली, व ब्रम्हपुरी या ठिकाणी लाईनमन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande