अकोला शहरातील गुंठेवारी व गावठान क्षेत्रातील भुखंडावर नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या - महापौर
अकोला, 05 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी करताना, योजनेच्या निकषानुसार नगररचना विभागामार्फत घरकुल बांधकाम नकाशा मंजूर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी लाभार्थ्या
Photo


अकोला, 05 मार्च (हिं.स.)।

अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी करताना, योजनेच्या निकषानुसार नगररचना विभागामार्फत घरकुल बांधकाम नकाशा मंजूर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडे जमिनीच्या मालकी हक्काचे दस्तावेज असणे आवश्यक आहे, मात्र गावठाण क्षेत्रातील अनेक लाभार्थ्यांकडे मालमत्ता कर पावती व्यतिरिक्त इतर कोणतेही मालकी हक्काचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक स्वतःच्या नावावर जमीन नसतानाही अनेक वर्षांपासून गावठाण जमिनीवर वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नांवावर जमीन असणे अनिवार्य असल्यामुळे, अशा पात्र व गरजू लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

त्याअनुषंगाने, प्रधानमंत्री आवास योजना 1.0 (शहरी) प्रमाणेच गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नसून ते प्रत्यक्षात वास्तव्यास आहेत, अशा लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे पात्र ठरवून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत आवश्यक ती सवलत देण्यात यावी, तसेच गुंठेवारी क्षेत्रातील भूखंड धारकास त्यांचा भूखंड नियमानूकुल करण्यासाठी परवानगी दिल्यास अशा नागरीकांना PMAY योजनेचा सुध्दा लाभ घेता येईल असे निर्देश आज महापौर शारदा रणजीत खेडकर यांनी मनपा आयुक्त यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande