
अकोला, 05 मार्च (हिं.स.)।
अकोट फैल परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून शिताफीची कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारती हिरालाल धमेरीया यांनी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या घराजवळ आरोपी रितीक अनिल बिहुणे व त्याचा चुलत भाऊ विनीत विजय बिहुणे राहत होते. आरोपीला दारू पिण्याची सवय असून तो नेहमी दारूच्या नशेत विनीतला त्याच्या नावावरील घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रॉपर्टीच्या वादातून एका भावाने दुसऱ्या सख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनीत बिहुणे अस मृतकाचे नाव आहे. दोन सख्या भावांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर टोकाच्या भांडणात झाले. रागाच्या भरात एका भावाने दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बापू नगर आणि संपूर्ण अकोट फैल परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे