पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। नगररचना व मुल्यांकन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी ८ ते १० टक्के आणि ग्रामीण भागात सरासरी ५ ते ७ टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली आहे. रेडी
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ


पुणे, 05 मार्च (हिं.स.)। नगररचना व मुल्यांकन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी ८ ते १० टक्के आणि ग्रामीण भागात सरासरी ५ ते ७ टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली आहे. रेडी रेकनरच्या या दरवाढीला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली तर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजे एक एप्रिलपासून हे दर लागू होणार आहे. प्रस्तावित दरवाढ मान्य झाल्यास घरांच्या, जमिनींच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील नगररचना व मुल्यांकन विभागाने पुढील आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे. चालु आर्थिक वर्षभरात झालेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहारांची आकडेवारींचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कोणत्या परिसरात वाढ दिसत आहे, याची सुद्धा मांडणी करण्यात आली. त्यानुसार ही वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे नगररचना व मूल्यांकन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल मान्यतेसाठी लवकरच नोंदणी महानिरिक्षक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande