
नाशिक, 05 मार्च (हिं.स.) - योग आणि आयुर्वेद यांच्या एकत्रित उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना दिलासा देणाऱ्या डॉ.संदीप चिंचोलीकर व डॉ .मंजिरी चिंचोलीकर यांच्या आयुर्योगआयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटरचा पंधरावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला .
याप्रसंगी पंचकर्माबाबत अनेक सवलतींच्या दराच्या पॅकेजेसचे अनावरण करण्यात आले. अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक गोविंद झा,बीबीएनजीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी माध्यमिक विशेषज्ञ डॉ.अभिजीत चांदे ,डॉ. चौधरी, अशोका बिल्डकॉनचे सीईओ संजय लोंढे ,नंदकुमार चिंचोलीकर, नंदकिशोर जोशी हे मान्यवर तसेच असंख्य नाशिककर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV