
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील ३४ ॲमेनिटी स्पेसपैकी ३१ ठिकाणी पार्किंग सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात सध्या मेट्रोच्या तीन मार्गिका कार्यरत किंवा अंतिम टप्प्यात आहेत. महामेट्रोमार्फत वनाज–रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड हे मार्ग सुरू झाले असून रोज सुमारे दीड लाख ते दोन लाख प्रवासी प्रवास करत आहेत. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत हिंजवडी–शिवाजीनगर मार्गाचे काम सुरू आहे. पुढील काही महिन्यात काम पूर्ण होऊन ही मेट्रो सेवा सुरु होणार आहे.
नागरिक मेट्रो सेवा वापरत असले तरी त्यांची खासगी वाहने मेट्रो स्टेशन येथे लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या परिसरात किंवा मेट्रो स्टेशनच्या खाली दुचाकी लावलात. अनेकदा दुचाकी नो पार्किंगमध्ये लावल्याने वाहतूक पोलिस उचलून घेऊन जाता. त्याचा भूर्दंड नागरिकांना बसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु