पुणे शहरात ७० ठिकाणी आरोग्याला धोका
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। महापालिकेकडून सुमारे २८०० कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. कोंढवा, हडपसर, कात्रज यांसह अनेक भागांत नवीन जलवाहिनी टाकली नसल्यामुळे ७० ठिकाणी जुन्या जलवाहिन्या
water


पुणे, 05 मार्च (हिं.स.)।

महापालिकेकडून सुमारे २८०० कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. कोंढवा, हडपसर, कात्रज यांसह अनेक भागांत नवीन जलवाहिनी टाकली नसल्यामुळे ७० ठिकाणी जुन्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने खर्च कमी करण्यासाठी काही भाग योजनेतून वगळला होता. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

समान पाणीपुरवठा योजनेतून जलवाहिनी टाकण्यात येणार काही भाग वगळला आहे. त्यामुळे महापालिकेचा खर्च कमी झाला. या जुन्या जलवाहिनीच्या शेजारी सांडपाणी वाहिनी असून, त्यातून गळती होणारे मैलापाणी जलवाहिनीत जात आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. यावरून महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या असून या सर्व प्रकारावरून सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande