पुणे - महिला दिनानिमित्त पुण्यात दुय्यम निबंधक कार्यालयांचा कारभार महिलांकडे
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे सारथ्य महिला कर्मचारीच सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कारभार महिलांच्याच हाती असणार आहेत. त्यातही शहरातील दुय्यम निबंधक
पुणे - महिला दिनानिमित्त पुण्यात दुय्यम निबंधक कार्यालयांचा कारभार महिलांकडे


पुणे, 05 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे सारथ्य महिला कर्मचारीच सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कारभार महिलांच्याच हाती असणार आहेत. त्यातही शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी महिलांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या 11 सह दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत. सह दुय्यम निबंधक हवेली क. 1, 2, 5, 7, 10, 11, 14, 15, 19, 26 व 27 ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सदर सर्व कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम पाहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande