रत्नागिरी : श्रीमान कथासंग्रहाला साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : येथील माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मे २०२४ मध्ये प
श्रीमान कथासंग्रहाला साहित्यरत्न पुरस्कार प्रदान


रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : येथील माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

मे २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या श्रीमान या कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांच्या हस्ते लेखक दुर्गेश आखाडे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, माहेर संस्थेच्या विश्वस्त शर्लिन दीदी, निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश नाईक, जि. प. सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर, हर्षदा गावडे, पं. स. सदस्या विद्या बोंबले, सरपंच तन्वी कोकजे व इतर मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande