
नांदेड, 05 मार्च (हिं.स.)।
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात दि. ८ ते २२ मार्च दरम्यान जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, यात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे. पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नाही तर ती सांस्कृतिक पद्धती म्हणुन पाण्याची जपणूक करावी. पाण्याच्या संवर्धाना साठी स्थानिक पंरपरा यांचा उपयोग मुख्यत: विचारात घ्यावेत. गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे. प्रत्येक गावात युवकांचा जल सवर्धनासाठी
सहभाग घेणेसाठी यंग बिग्रेडची स्थापना करावी. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धनासाठी उपाययोजनांचा समावेश या महोत्सवांतर्गत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गावोगावी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम या प्रसंगी राबवले जाणार आहेत.
पाणी पुरवठा सामुदायिक जीवनामध्ये खोलवर रुजलेली एक महत्वाची बाब आहे. ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार आहे अशी माहिती
पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी दिली.
गाव व पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल. जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे. पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरुस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis