गोदरेज प्रॉपर्टीजने कोलकात्यातील 5 एकर जमीन खरेदीसाठीची जिंकली बोली
मुंबई, 05 मार्च, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) ने वेस्ट बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (WBHIDCO) यांनी आयोजित केलेल्या ई-लिलावात कोलकात्यातील ईएम बायपा
गोदरेज प्रॉपर्टीजने कोलकात्यातील 5 एकर जमीन खरेदीसाठीची जिंकली बोली


मुंबई, 05 मार्च, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) ने वेस्ट बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (WBHIDCO) यांनी आयोजित केलेल्या ई-लिलावात कोलकात्यातील ईएम बायपास जवळील सुमारे 5 एकर क्षेत्रफळाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीसाठीची बोली जिंकली असल्याचे आज जाहीर केले. ही जागा शहरातील अत्यंत मागणी असलेल्या आणि उच्चभ्रू निवासी परिसरात स्थित आहे.

प्रस्तावित प्रीमियम निवासी प्रकल्पातून अंदाजे 1,650 कोटी रु. * महसूल क्षमता अपेक्षित आहे.

ईएम बायपास मार्ग हा कोलकात्यातील सर्वाधिक सुसंलग्न आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरी पट्ट्यांपैकी एक असून मजबूत प्रत्यक्ष आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा आधार आहे. हा मार्ग सॉल्ट लेक, न्यू टाऊन, पार्क सर्कस, गरियाहाट आणि गरिया यांसारख्या प्रमुख परिसरांना जोडतो. त्यामुळे शहरभरातील व्यावसायिक केंद्रे, IT-ITeS क्लस्टर्स, शैक्षणिक संस्था आणि अग्रगण्य आरोग्य सुविधा यांना सुलभ विनाअडथळा प्रवेश शक्य होतो. अनेक उड्डाणपूल, मुख्य जोडमार्ग आणि बांधकाम सुरु असलेल्या गरिया- विमानतळ मेट्रो मार्गाच्या जवळ असल्यामुळे संपर्कक्षमता अधिक वाढते. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोयीस्कर रस्ते संपर्क उपलब्ध असल्यामुळे हा परिसर कोलकात्यातील सर्वाधिक आकर्षक आणि भविष्याभिमुख मायक्रो मार्केट्सपैकी एक म्हणून अधिक मजबूत झाला आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले: “कोलकात्यातील गृहखरेदीदार आता अधिकाधिक प्रमाणात मजबूत संपर्कक्षमता, विश्वासार्ह सामाजिक पायाभूत सुविधा आणि बदलत्या जीवनशैलीच्या गरजांशी सुसंगत घरे असलेल्या परिसरांचा शोध घेत आहेत. ईएम बायपास मायक्रो-मार्केट या बदलाचे प्रतिबिंब दर्शवते. त्यादृष्टीने आमच्यासाठी या ठिकाणी आमचे स्थान अधिक मजबूत करणे महत्त्वाचे ठरते. या संपादनाद्वारे आम्ही गुणवत्तापूर्ण जीवनशैलीला पाठिंबा देणारा, आजच्या कुटुंबांना ज्या प्रकारे जगायचे आहे त्यानुसार स्वतःला जुळवून घेईल असा आणि आमच्या ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य सादर करणारा सुयोग्य नियोजन केलेला निवासी समुदाय उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande