
गुरुग्राम, 05 मार्च (हिं.स.)। निवासी प्रकल्पासाठी गुरुग्राम, हरियाणा येथे 11.36 एकर जमीन थेट खरेदीद्वारे संपादित केल्याची घोषणा भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (GPL), (BSE स्क्रिप आयडी: GODREJPROP) केली. या प्रकल्पातून 4,500 कोटी* रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. या निवासी प्रकल्पात प्रीमियम लो-राईज आणि हाय-राईज रेसिडेन्सीज, अपवादात्मक जीवनशैली सुविधांचा समावेश असेल.
हा भूखंड गुरुग्राममधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सेक्टर 63A मध्ये आहे. गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड मायक्रो-मार्केटचा तो एक भाग आहे. गोल्फ कोर्स रोड, सोहना रोड आणि एनएच-48 सोबत त्याची मजबूत कनेक्टिव्हिटी आहे. निवासी, व्यावसायिक आणि रिटेल डेव्हलपमेंटसाठी या मायक्रो-मार्केटला चांगलीच मागणी आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “या नवीन प्रकल्पामुळे, आर्थिक वर्ष 26 मध्ये पोर्टफोलिओच्या माध्यमातून भविष्यातील विक्री क्षमता 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढवली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आमच्या व्यवसाय विकास मार्गदर्शनाच्या दुप्पट वितरणाचे हे प्रतिनिधित्व करते. तसेच भविष्यातील बुकिंग मूल्याच्या बाबतीत हे आमचे सर्वोत्तम वर्ष आहे. आम्हाला विश्वास आहे की, पुढील वर्षांमध्ये शाश्वत मजबूत वाढीसाठी गोदरेज प्रॉपर्टीज स्वतःचे स्थान अधिक भक्कम करेल.
गोल्फ कोर्स एक्स्टेंशन रोड हा एनसीआरमधील सर्वात हवाहवासा भाग आहे. येथे काम करण्यासाठी उत्तम व्यावसायिक जागा आहेतच पण प्रीमियम निवासी गृहप्रकल्प देखील आहेत. हे नवीन अधिग्रहण एनसीआरमधील आमच्या विकास पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करेल, सूक्ष्म-बाजारांमध्ये उत्तम वैविध्यासह, आम्हाला या भागाची मागणी पूर्ण करण्यास सक्षम करेल. रहिवाशांसाठी कायमस्वरूपी मूल्य निर्माण करणारे अपवादात्मक निवासी समुदाय तयार करण्यावर आमचे लक्ष आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर