
पुणे, 05 मार्च (हिं.स.)।
पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्ते, नाले आणि ड्रेनेजव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेने यंदा मोठी आर्थिक तरतूद करीत तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्येकी 10 कोटी रुपये मंजूर करीत पुढील महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्याचे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना उरलेला असताना ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ उपायुक्तांसमोर उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु