नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – महापौर
ठाणे, 05 मार्च, (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यंदाचे स्वागतयात्रेचे 26 वे
नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – महापौर


ठाणे, 05 मार्च, (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यंदाचे स्वागतयात्रेचे 26 वे वर्ष असून हा शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज झालेल्या बैठकीत केले.

नववर्ष स्वागतयात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून आज (05 मार्च 2026) महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके,दिपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त डॉ. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक निखिल सुळे, सहनिमंत्रक भरत अनखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘समर्थ ठाणे- सशक्त भारत’, ‘वंदे मातरमची 150 वर्षे’, ‘भारत 2047’, ‘नागरी शिष्टाचार’ या विषयावर आधारित चित्ररथ स्वागत यात्रेत असणार आहेत. नववर्ष स्वागतयात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावे तसेच महापालिकेच्या शिक्षणविभाग, आरोग्य, प्रदुषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे असेही महापौरांनी यावेळी नमूद केले. तसेच शहरातील विविध भागातून ज्या उपयात्रा निघणार आहेत, त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

19 मार्च 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता श्रीकोपिनेश्वर मंदिरापासून स्वागतयात्रेस सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजीमार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहिल या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागतयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्ण्वाहिका उपलब्ध करावी. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनेही सदरचा परिसर स्वच्छ करुन घेण्याबाबतच्या सूचनाही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या.

श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागतयात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, तीन पेट्रोलपंप मार्गे हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळीनाका, हरिनिवास सर्कल व समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला या बैठकीत देण्यात आल्या.

भारतीय नववर्षानिमित्त रविवार 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत तीन हात नाका येथील दादा कोंडके ॲम्पीथ‍िएटर येथे कलांकुर आर्ट फाऊंडेशन प्रस्तु महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण होणार आहे. यात ठाण्यातील विविध नृत्यगुरू व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कला पाहावयास मिळणार आहेत.

17 मार्च ते 19 मार्च 2026 या कालावधीत गांवदेवी मैदान येथे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जीवन प्रदर्शनी आणि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या 12 गडकिल्ल्यांच्या प्र तिकृती, तसेच संस्थकर भारती आयोजित महारांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच फोटो सर्कल सोसायटी, ठाणे आयोजित छायाचित्र प्रदर्शन, छंदोत्सव ग्रंप मुंबईतर्फे वेगवेगळ्या छंदवस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात असल्याची माहिती कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी बैठकीत दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande