अमरावती : अंबादेवी संस्थानच्या  विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयुक्तांची पाहणी
अमरावती, 06 मार्च (हिं.स.) अंबादेवी संस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित भव्य विकास आराखड्याच्या अनुषंगाने, MSIDC मार्फ़त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंदिर परिसर
अंबादेवी संस्थानच्या  विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयुक्तांची पाहणी


अमरावती, 06 मार्च (हिं.स.)

अंबादेवी संस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित भव्य विकास आराखड्याच्या अनुषंगाने, MSIDC मार्फ़त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासाचा हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येत असून, यात अमरावती महानगरपालिका तसेच इतर संबंधित यंत्रणांचा सहभाग आहे.पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील विद्यमान सुविधा, भाविकांची वाढती गर्दी, वाहतूक व्यवस्था तसेच प्रस्तावित विकासकामांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला. या विकास आराखड्यात मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी अधिक सोयीसुविधा, दर्शन व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन, भव्य प्रवेशद्वार, तसेच वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आदी बाबींचा समावेश आहे.या पाहणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी विकास आराखड्याच्या अनुषंगाने समन्वयातून व नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यावर भर दिला.या विकास प्रकल्पामुळे अंबादेवी–एकविरा देवी मंदिर परिसर अधिक सुविधायुक्त व आकर्षक होऊन भाविकांना सुलभ व सुकर दर्शनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande