बीड - मंत्री भरणे यांच्या सोबत आमदार सुरेश धस यांची बैठक
बीड, 06 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील जैविक खते उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीीत आमदार सुरेश
अ


बीड, 06 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील जैविक खते उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीीत आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती

या बैठकीत राज्यातील काही जैविक खते उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून झालेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित संस्थांवर कायदेशीर कार्यवाही करणे व आवश्यक असल्यास त्यांच्या नोंदणी रद्द करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संबंधित प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा याबाबत मुद्दे मांडले. शेतकऱ्यांच्या नावावर कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.अशी भूमिका बैठकीत मांडली.

या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्तालय पुणे येथील आयुक्त, पणन संचालनालय पुणे येथील संचालक, पणन मंडळ पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक तसेच कृषी विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande