लातूर : ;मनपा व पोलिसांची संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम
लातूर, 06 मार्च (हिं.स.)। गंजगोलाईत अतिक्रमण हटाव मोहीम ; मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई. सहा हातगाडे जप्त. लातूर : शहरातील गंजगोलाईत लातूर शहर महानगरपालिका व पोलिसांच्या वतीने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.यात ६ हातगाडे व वजन क
अतिक्रमण


लातूर, 06 मार्च (हिं.स.)।

गंजगोलाईत अतिक्रमण हटाव मोहीम ; मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई. सहा हातगाडे जप्त.

लातूर : शहरातील गंजगोलाईत लातूर शहर महानगरपालिका व पोलिसांच्या वतीने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.यात ६ हातगाडे व वजन काटे जप्त करण्यात आले.

गंजगोलाई ही लातूरची प्रमुख बाजारपेठ आहे.विशेष म्हणजे या परिसरातून असंख्य रस्ते जात असल्याने वाहतूकही सुरू असते. सध्या रमजान व गुढीपाडवा यासारखे मोठे सण तोंडावर आलेले असल्याने बाजारपेठेत वर्दळ आहे. अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. याशिवाय खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे मनपाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.

गुरुवारी मनपा व पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.असंख्य फेरीवाल्यांनी रस्ते व्यापल्याने त्यांना हटविण्यात आले. वारंवार सूचना करूनही हातगाडे हटत नसल्याने ६ हातगाडे व वजन काटे पोलिस व मनपाच्या पथकाने जप्त केले.

या कारवाईत गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे,उपनिरीक्षक बाबू गीते, माधव केंद्रे मनपाचे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, मुख्य स्वच्छता निरीक्षक शिवराज शिंदे, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष रणदिवे, सी झोनचे सर्व स्वच्छता निरीक्षक, यांच्यासह मनपा व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करू नयेत.रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी हातगाडे उभे करू नयेत. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने हातगाडे उभी करू नयेत. महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात येईल,असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande