
पुणे, 07 मार्च, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपकेंद्र आता छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणार आहे. दहा एकर जागेत या उपकेंद्राच्या बांधकामासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून, सुमारे २३८ कोटी ११ लाख रुपयांचा खर्ज मंजूर करण्यात आला आहे. या उपकेंद्रात असलेल्या एक हजार उमेदवारांच्या निवास, प्रशिक्षणासाठी सुविधा विकसित केली जाणार असल्याने मराठवाड्यातील उमेदवारांची मोठी सोय होणार आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. सन २०११ साली केलेल्या जनगणनेनुसार राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांत अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘बार्टी’चे मुख्यालय पुण्यात झाले. या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती अशा विविध योजना राबवण्यात येतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु