भंडारा : बाळ विक्री प्रकरणात डॉ. नितेश वाजपेयीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गोंदिया, 07 मार्च (हिं.स.)। येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. या प्रकरणात अधिक तपास केला असताना आणखी एक बाळ डॉक्टरन
Bhandara doctor


गोंदिया, 07 मार्च (हिं.स.)। येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. या प्रकरणात अधिक तपास केला असताना आणखी एक बाळ डॉक्टरने विक्री केला असल्याचं उघड झालं. त्या बाळाची आई ही अल्पवयीन मुलगी होती. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया येथे आली होती. मुलगी प्रसूती साठी बालाजी डॉस्पिटल येते आली असताना डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी याची माहिती पोलिसांना न देता प्रसूती करून बाळ परस्पर विक्री केला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशन मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे डॉक्टर नितेश वाजपेयी यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande